राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे 'गणतंत्र मंडप' असं नामकरण, अशोक हॉल आता 'अशोक मंडप'

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील दोन महत्त्वाच्या सभागृहांचे नामकरण केले आहे. त्यानुसार दरबार हॉलचे ‘गणतंत्र मंडप’, तर अशोक हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामकरण करण्यात आले आहे
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे 'गणतंत्र मंडप' असं नामकरण, अशोक हॉल आता 'अशोक मंडप'
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात पार पडणाऱ्या विशिष्ट समारंभांचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या दोन महत्त्वाच्या सभागृहांचे आता नामकरण करण्यात आले आहे. यापैकी महत्त्वाचा असलेला दरबार हॉल आता यापुढे 'गणतंत्र मंडप' म्हणून ओळखला जाणार आहे, तर अशोक हॉल यापुढे 'अशोक मंडप' म्हणून ओळखला जाणार आहे. या सभागृहांचे गुरुवारी नामकरण करण्यात आले. राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेले राष्ट्रपती भवन जनतेला पाहता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रपती भवनातील वातावरणात भारतीय सांस्कृतिक मूल्ये प्रतिबिंबित व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते.

आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील दोन महत्त्वाच्या सभागृहांचे नामकरण केले आहे. त्यानुसार दरबार हॉलचे ‘गणतंत्र मंडप’, तर अशोक हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामकरण करण्यात आले आहे, असे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ आयोजित करण्यात येतो, तर अशोक हॉल ही मूळ बॉलरूम होती.

logo
marathi.freepressjournal.in