दिल्लीत धुळीचे वादळ,दोघांचा मृत्यू, २३ जण जखमी

दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात शुक्रवारी रात्री धुळीच्या वादळाने थैमान घातले. या वादळामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडला. या वादळामुळे झाडे उन्मळून पडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.
दिल्लीत धुळीचे वादळ,दोघांचा मृत्यू, २३ जण जखमी
Published on

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात शुक्रवारी रात्री धुळीच्या वादळाने थैमान घातले. या वादळामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडला. या वादळामुळे झाडे उन्मळून पडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.

दिल्ली व एनसीआर परिसरात शुक्रवारी रात्री धुळीचे वादळ आले. त्याचबरोबर पाऊसही पडला. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. तसेच, त्याने दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला.

दिल्ली पोलीस नियंत्रण कक्षाकडे ४०९ आपत्कालीन कॉल्स आले. जनतेने झाडे पडण्याच्या व इमारत पडल्याच्या तक्रारी केल्या. झाडे कोसळल्याचे १५२ कॉल्स, इमारतींचे नुकसान झाले. ५५ कॉल्स, झाडे पडल्याने ६ जण जखमी व दोघेजण मरण पावल्याची माहिती देण्यात आली.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ‘पर्जन्यराजा’चे तुफान, ‘भेंडवळ’ येथील घटमांडणीचे भाकीत

नागपूर : राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेंडवळच्या घटमांडणीवर भाकीत अधिक विश्वास असतो. शनिवारी जामोद येथे घटमांडणी झाली. गेल्यावर्षी पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. या घटमांडणीत काय भाकीत निघणार यासाठी हजारो शेतकरी जमले होते. जून व जुलैमध्ये पाऊस कमी राहिल, पण ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्याची उणीव भरून निघेल, असे महत्वाचे भाकीत ‘घटमांडणी’तून पुढे आले. यंदा जून व जुलैमध्ये पावसाचा जोर कमी राहिल तर त्याची भरपाई ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये होणार आहे. सप्टेंबरमध्ये अवकाळीसारखा पाऊस होईल. राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही आहे. यंदा खरीप पिके साधारण राहील. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल.

सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे भेंडवळच्या घटमांडणीत राजकीय भविष्य काय असेल, याचा अंदाज व्यक्त केला. यात घटमांडणीत देशाचा राजा कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल. शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाही, असा अंदाज व्यक्त झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदाच्या पावसाळ्यात २२ भरतीचे दिवस असतील. काही लाटा ४.५ मीटर उंचीच्या असू शकतात.

राज्यात १८ मेपर्यंत अवकाळी पाऊस

ऐन उन्हाळ्यात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, येत्या १८ मेपर्यंत राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

रायगडच्या ५२० गावांना पूर, दरडीचा धोका

अलिबाग : यंदाच्या पावसाळयात रायगडच्या ५२० गावांना पूर, दरडीचा धोका आहे, असे रायगड जिल्हा प्रशासनाने केलेल्या आपत्कालीन सर्व्हेक्षणात आढळले आहे. २३९ गावे दरडप्रवण क्षेत्रात आहेत. अंबा, पाताळगंगा, गढी, सावित्री, गांधारी, काळ, उल्हास, कुंडलिका, बाळगंगा नदीच्या काठावर २६२ गावे वसली आहेत. त्यामुळे १३६ गावांना पुराचा धोका आहे, असे सर्व्हेक्षणात आढळून आले.

मुंबई, उपनगरात पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात रविवारी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन तास अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला. चंद्रपूर जिल्ह्याला गारपीट होण्याची शक्यता आहे. पुणे, लातूर, नांदेड तसेच सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in