Earthquake : राजधानीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दिल्लीसह-एनसीआरसह हरियाणा, उत्तराखंड, पश्मि उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले.
 Earthquake : राजधानीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुमारे एक मिनिट भूकंपाचे धक्के जाणवत होते. यावेळी इमारती देखील हादरत होत्या. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र, ती खूप जास्त जाणवली. दिल्लीसह-एनसीआरसह हरियाणा, उत्तराखंड, पश्मि उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळ होता आणि त्याची खोली पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली होती. नेपाळमध्ये आज दुपारी २२५ वाजता ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा तर २:५१ वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. उंच इमरती असलेल्या भागात हा भूकंप मोठ्या तीव्रतेने जाणवला. एकापाठोपाठ एक धक्के जाणवत राहीले. दिल्ली-एनसीआरमध्ये लोक इमारतींमधून बाहेर धावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.

यावेळी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचा निर्माण भवन इमारतीतून बाहेर येतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. भूकंपाचे धक्के बसले त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय भूकंपाच्या धक्क्यावेळा निर्माण भवन इमारतीत होते. भूकंपाचे धक्के जामवताच ते तातडीने बाहेक पडले. यावेळचा व्हिडिओ समोर आला आहे. या मुळे उत्तर भारतात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in