दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले, 6.1 रिश्टर स्केलचा धरणीकंप; पाक-अफगाणिस्तानलाही धक्के

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील पीर पांचाल भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले,  6.1 रिश्टर स्केलचा धरणीकंप; पाक-अफगाणिस्तानलाही धक्के

दिल्ली-एनसीआरमध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 6.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती आहे. बराच वेळ या भूकंपाचे धक्के जाणवत होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील काबूलच्या उत्तर ईशान्येस 241 किलोमीटर अंतरावर होता, असे समजते. तसेच, पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. दिल्ली-एनसीआरशिवाय जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील पीर पांचाल भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

शास्त्रज्ञांनी दिला होता इशारा-

शास्त्रज्ञांकडून यापूर्वीच दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचा इशारा देण्यात आला होता. दिल्ली-एनसीआरमध्ये कधीही मोठा भूकंप होऊ शकतो, ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, कारण दिल्लीच्या खाली 100 पेक्षा जास्त भुयारे आहेत. यापैकी काही बंद आहेत तर काही सक्रिय आहेत, अशा परिस्थितीत तीव्र भूकंप झाल्यास दिल्ली-एनसीआरमध्ये मोठे नुकसान होऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in