तेलंगणा, आंध्रला भूकंपाचे धक्के

तेलंगणामधील मुलुगूला बुधवारी सकाळी ५.६ रिक्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसले. मात्र, त्यामध्ये जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगू येथे होता.
तेलंगणा, आंध्रला भूकंपाचे धक्के
Published on

हेदराबाद : तेलंगणामधील मुलुगूला बुधवारी सकाळी ५.६ रिक्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसले. मात्र, त्यामध्ये जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगू येथे होता.

सकाळी ७.२७ वाजण्याच्या सुमाराला हा भूकंपाचा धक्का बसला, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या विविध भागांमध्येही धक्के जाणवले. तथापि, मोडकळीस आलेल्या घरांची आणि तात्पुरत्या बांधकामांची पाहणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मुलुगूजवळच्या वारंगळ येथील नागरिकांनी सांगितले की, काही सेकंद आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील पंखे जोराने हलू लागले आणि कपाटातील भांडी खाली कोसळली. आणखी काही दिवस धक्के जाणवण्याची शक्यता असली तरी नागरिकांनी घाबरू नये, असे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्यावतीने सांगण्यात आले.

तेलंगणमधील खम्मनसह अन्य जिल्ह्यांना काही सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाशी संबंधित व्हिडीओही त्वरित व्हायरल झाले. जनतेने गर्दीची ठिकाणे अथवा असुरक्षित बांधकांमांच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in