हिवाळ्यात 'बाजरी' खा आणि 'या' आजारांपासुन दूर रहा

थंडीच्या दिवसांत बाजरी, ज्वारी, जवस, नाचणी यांसारख्या धान्याचा आहारात समावेश करणं फार फायदेशीर मानलं जातं.
हिवाळ्यात 'बाजरी' खा आणि 'या' आजारांपासुन दूर रहा

थंडीच्या दिवसांत बाजरी, ज्वारी, जवस, नाचणी यांसारख्या धान्याचा आहारात समावेश करणं फार फायदेशीर मानलं जातं. या धान्यामधील पोषक तत्त्व आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी मदत करतात. महाराष्ट्रात बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. ग्रामीण भागात बाजरीची भाकरी आवडीने खाल्ली जाते. तर खानदेशात थंडीच्या दिवसात बाजरीची खिचडी करून खाल्ली जाते. बाजरी, ज्वारी, जवस, नाचणी या धान्यात फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन असल्याने प्रतिकारकशक्ती तर चांगली राहतेच पण त्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून देखील सुटका होते.

हिवाळ्यात बाजरीची भाकरी किव्हा हलवा खाल्ल्याने शरीराला बहुतांश फायदे होतात. बाजरी हे भरड धान्य आहे, ज्यामध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनसह अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. बाजरीचा हलवा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्तीही सुधारते आणि आपण थंडीत कमी आजारी पडतो.

आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराला ऊब मिळते. त्यामुळे शरीराचं तापमान योग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते. बाजरीत नियासिन नावाचा घटकदेखील असतो. तो खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तदाब नियंत्रित करते.

बाजरीच्या हलव्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया चांगले काम करते. बाजरीची खीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या कमी होते. यासोबत बाजरीचा हलवा वजन कमी करण्यासही मदत करू शकतो.

बाजरीत कॅल्शियम देखील चांगले असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. थंड वातावरणात बाजरीचा हलवा खाल्ल्याने सांधेदुखीची समस्या कमी होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in