निवडणूक आयोगाची तेजस्वी यादवना नोटीस

बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवलेले मतदार ओळखपत्रासंबंधी स्पष्टीकरण मागितले आहे. तेजस्वी यादव यांनी दाखवलेला मतदार क्रमांक (ईपीआयसी) वैध नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाची तेजस्वी यादवना नोटीस
Photo : X (@TejashwiYdvRJD)
Published on

पाटणा : बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवलेले मतदार ओळखपत्रासंबंधी स्पष्टीकरण मागितले आहे. तेजस्वी यादव यांनी दाखवलेला मतदार क्रमांक (ईपीआयसी) वैध नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. तेजस्वी यादव यांच्याकडे दोन मतदान क्रमांक असल्याने त्यांच्याकडून निवडणूक आयोगाने उत्तर मागितले आहे. “तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेले ओळखपत्र अधिकृतपणे जारी केलेले दिसत नाही. अशा परिस्थितीत त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. आयोगाने ईपीआयसी कार्डची माहिती आणि मूळ प्रत मागितली आहे. जेणेकरून तेजस्वीकडे दोन ईपीआयसी क्रमांक कसे आहेत, याची चौकशी करता येईल,” असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

बिहारमध्ये मतदार यादीवरून प्रश्न उपस्थित करताना तेजस्वी यादव यांनी माझे नाव वगळण्यात आल्याचे सांगितले होते. नंतर प्रशासनाने तेजस्वीचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर तेजस्वी म्हणाले होते की, माझा ईपीआयसी क्रमांक बदलण्यात आला आहे. आता निवडणूक आयोग तेजस्वीने दाखवलेल्या ईपीआयसी क्रमांक आणि मतदार कार्डची चौकशी करेल.

logo
marathi.freepressjournal.in