खासगी गुंतवणुकीच्या नवीन फेरीनंतर आर्थिक वाढीला चालना शक्य

कॉर्पोरेट क्षेत्राकडून भांडवली खर्चाच्या नव्या फेरीनंतर पुढील टप्प्यात आर्थिकवाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
खासगी गुंतवणुकीच्या नवीन फेरीनंतर आर्थिक वाढीला चालना शक्य

मुंबई : कॉर्पोरेट क्षेत्राद्वारे भांडवली खर्चाची नवीन फेरी विकासाच्या पुढील टप्प्याला चालना देईल, असे आरबीआयच्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. किरकोळ महागाई दर चार टक्के स्थिर किंवा त्याहून कमी राहिल्यास जीडीपी वृद्धीला मदत होईल, असेही त्यात नमूद केले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या फेब्रुवारी बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’वरील लेखात म्हटले आहे की, २०२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत वाढ होण्याची शक्यता अलीकडच्या काही महिन्यांत बळकट झाली आहे. २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेने प्राप्त केलेली विकासाची गती कायम ठेवली आहे, असे त्यात म्हटले आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, कॉर्पोरेट क्षेत्राकडून भांडवली खर्चाच्या नव्या फेरीनंतर पुढील टप्प्यात आर्थिकवाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, खासगी कॉर्पोरेट क्षेत्राचा गुंतवणुकीचा हेतू या वर्षात आतापर्यंत सकारात्मक राहिला आहे.

एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रमुख बँका/अखिल भारतीय वित्तीय संस्थांकडून कर्ज मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांची एकूण किंमत २.४ लाख कोटी रुपये होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी जास्त होती.

logo
marathi.freepressjournal.in