ईडीची कारवाई राजकारणातील सर्वात खालची पायरी - सिब्बल

गांधी कुटुंबाला त्यांच्या पापाची किंमत चुकवावी लागेल, असे सांगताना ते म्हणाले की, ‘‘गांधी घराण्याने स्वातंत्र्य चळवळीत केवळ काँग्रेसचा वारसाच नाही
ईडीची कारवाई राजकारणातील सर्वात खालची पायरी - सिब्बल

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या मोठ्या कारवाईनंतर आता काँग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी ही कारवाई म्हणजे राजकारणातील सर्वात खालची पायरी असून चौकशी संस्था आता सत्ताधाऱ्यांसाठी काम करणाऱ्या बनल्या असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने केलेल्या या प्रकारच्या प्रतिक्रियांनंतर भाजपनेही प्रतिघात केला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत गांधी कुटुंबावर नॅशनल हेरॉल्डच्या संपत्तीवर कब्जा केल्याचा आरोप करीत सांगितले की, आता बंद पडलेल्या वृत्तपत्राच्या मालमत्तेचे त्याच्या ‘वैयक्तिक मालमत्तेत’ रूपांतरित केले आहे.

गांधी कुटुंबाला त्यांच्या पापाची किंमत चुकवावी लागेल, असे सांगताना ते म्हणाले की, ‘‘गांधी घराण्याने स्वातंत्र्य चळवळीत केवळ काँग्रेसचा वारसाच नाही, तर त्याची मालमत्ताही घेतली,’’ असेही ते म्हणाले. नॅशनल हेरॉल्ड केसमध्ये ईडीने मोठी कारवाई केली होती. त्यात ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाची ७५१.९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.

खासदार कपिल सिब्बल यांनी सांगितले की, जेव्हा अज्ञान हा आनंद आहे, तेव्हा शहाणे होणे मूर्खपणाचे आहे. मला वाटत नाही की ईडीने कायद्याबाबत अनभिज्ञ असेल. शेअरहोल्डर हा भागधारक असतो, तर मालमत्ता ही कंपनीची मालकी असते. कंपनी लिक्विडेशनमध्ये गेली तर... शेअरहोल्डरला काहीच मिळत नाही. मग कोणी कोणाची फसवणूक केली? विश्वासघात कुढे झाला, कोणी ।ड्यंत्र रचले... मला वाटते की, त्यांना कायदा माहिती

ट्रस्ट कुठे आहे? कोणी षडयंत्र रचले? मला वाटते त्यांना कायदा माहित आहे. मला वाटते की न्यायालयांनाही कायदा माहित आहे. त्यामुळे मी ही थोडा गोंधळलो आहे, असेही सिब्बल यांनी या संबंधात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in