ईडीकडून अनिल अंबानी समूह कंपन्यांविरोधात आरोपपत्र दाखल

रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्या आणि माजी अधिकाऱ्यांशी संबंधित दोन वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे, असे अंमलबजावणी महासंचालनालयाने रविवारी सांगितले.
ईडीकडून अनिल अंबानी समूह कंपन्यांविरोधात आरोपपत्र दाखल
Published on: 

नवी दिल्ली : रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्या आणि माजी अधिकाऱ्यांशी संबंधित दोन वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे, असे अंमलबजावणी महासंचालनालयाने रविवारी सांगितले.

पहिल्या प्रकरणात, द्वारका येथील पीएमएलए न्यायालयासमोर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स समूहाचे माजी अधिकारी सतीश सेठ आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

दुसरे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या संदर्भातील असून, या प्रकरणात ‘ईडी’ने राऊस ॲव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपपत्र ईडीने मार्च महिन्यात दाखल केले होते. पीएमएलए अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत आरकॉम, रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, ‘राग’चे माजी अधिकारी सतीश सेठ आदींना नामांकित केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in