'नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात ईडीला मिळाली हवाला लिंक

दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाच्या कार्यालयाच्या तपासणीदरम्यान ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत
'नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात ईडीला मिळाली हवाला लिंक
Published on

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात ईडीला हवाला लिंक मिळाल्याने ईडी पुन्हा कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करणार आहे. यापूर्वी दोघांनी केलेल्या वक्तव्याची फेरतपासणी केली जाणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संलग्न कंपन्या आणि थर्ड पार्टीत झालेल्या हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत, असा दावा ईडीच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे.

दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाच्या कार्यालयाच्या तपासणीदरम्यान ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत. मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्सच्या व्यवहाराचे पुरावे कागदपत्रांमध्ये मिळाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी हे अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंग इंडियाच्या कार्यालयाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तपास यंत्रणा मोठी कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येते. नॅशनल हेराल्डप्रकरणी यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झाली आहे. यंग इंडियाकडून रोखीसंबंधी इतर कोणताही लाभ घेतला नसल्याचे सोनिया गांधी यांनी चौकशीत सांगितले होते. दरम्यान, यंग इंडियाकडून मिळालेल्या कागदपत्रांनंतर ईडी विभागाचे अधिकारी राहुल, सोनिया गांधी यांनी दिलेल्या उत्तरावर समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांच्या जबाबांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in