मनी लाँड्रिंगप्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी संपली

काँग्रेस, असोसिएट जर्नल आणि यंग इंडियनशी संबंधित सर्व व्यवहार माजी खजिनदार मोतीलाल व्होरा पाहत होते
मनी लाँड्रिंगप्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी संपली
Published on

नॅशनल हेराल्डमधील मनी लाँड्रिंगप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी तीन तास चौकशी केली. ही चौकशी संपली असून, ‘ईडी’ने त्यांना अद्याप कोणतीही नवीन नोटीस दिलेली नाही.

मंगळवारी जेव्हा ‘ईडी’ने सोनियांना कंपन्यांच्या व्यवहारांबद्दल विचारले, तेव्हा सोनियांनी उत्तर दिले की, “काँग्रेस, असोसिएट जर्नल आणि यंग इंडियनशी संबंधित सर्व व्यवहार माजी खजिनदार मोतीलाल व्होरा पाहत होते.” ‘ईडी’ने बुधवारी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, यंग इंडिया लिमिटेड ही संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते? तुमच्या निवासस्थान असलेल्या १० जनपथवर व्यवहाराबाबत किती बैठका झाल्या? तुम्हाला व्यवहाराबद्दल काय माहिती आहे? त्याचे शेअर्स कसे विकले? आदीचा समावेश होता. सोनियांना एकूण १२ तासांच्या चौकशीत १०० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारीही सोनियांच्या चौकशीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने केली.

logo
marathi.freepressjournal.in