कोलकाता : पश्चिम बंगामलधील तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या घरावर धाड टाकालयला संदेशखल्ली येथे गेलेल्या इडी पथकावर ५ जानेवारी रोजी हल्ला करण्यात आलाह होता. या प्रकरणी पोलिसांनी आता आणखी दोन जणांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणी अटक झालेल्यांची एकूण संख्या चार झाली आहे. इडीने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात इडी अधिकाऱ्यांपैकी तीन जण जखमी झाले होते व त्यांच्या अंगावरील मौल्यवान वस्तू पळवून नेण्यात आल्या होत्या. तृणमूल कॉंग्रेसचे नेता शाजहान शेख यांच्या संबंधितांनावर धाड मारण्यास गेलेल्या इडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. त्याचा तपास सुरु आहे. तपासात एका आरोपीला नझात येथून तर दुसऱ्यास मिनाखा येथून अटक करण्यात आली होती. ही ठिकाणे २४ परगणा जिल्ह्यात आहेत. अशा प्रकारे या प्रकरणात आता एकूण चार जणांना अटक झाली आहे.