पश्चिम बंगालमध्ये ईडी मोठ्या कारवाईच्या तयारीत

घटनेनंतर शेख फरार झाले असून त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये ईडी मोठ्या कारवाईच्या तयारीत

नवी दिल्ली : ईडीचे अधिकारी गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापेमारी करण्यासाठी गेले होते. तेव्हा या अधिकाऱ्यावर जमावाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता खुद्द 'ईडी'च्या संचालकांनी सोमवारी रात्रीच पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

ईडी आता येथे मोठी कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, ईडीचे संचालक राहुल नवीन सोमवारी रात्री कोलकातामध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी ते अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यामध्ये हल्ला आणि कारवाईच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कथित रेशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तृणमूलचे नेते शाहजहाँ शेख यांची चौकशी करण्यासाठी ईडीची टीम त्यांच्या घरी गेली होती. शेख यांच्या घराबाहेर जमलेल्या जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला करीत वाहनांची तोडफोड केली. घटनेनंतर शेख फरार झाले असून त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

राहुल नवीन यांची पदोन्नती

केंद्राने ईडीचे कार्यकारी प्रमुख राहुल नवीन यांची पदोन्नती अतिरिक्त सचिव स्तरावर केली आहे. राहुल नवी हे १९९३ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (आयकर) अधिकारी आहेत. संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी पूर्ण झाल्यानंतर ईडीचे प्रभारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in