दिल्लीत EDचे धाडसत्र! केजरीवालांच्या खासगी सचिव आणि खासदाराच्या घरासह १० ठिकाणी छापेमारी

दिल्लीत EDचे धाडसत्र! केजरीवालांच्या खासगी सचिव आणि खासदाराच्या घरासह १० ठिकाणी छापेमारी

"ईडी मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या निवासस्थानासह..."

दिल्ली जल बोर्डातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ईडीने आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार आणि आपचे राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ही छापेमारी केली आहे. यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ईडी मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवांच्या निवासस्थानासह १० ठिकाणी छापेमारी करत शोध घेत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय यंत्रणा दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करत आहे. सीबीआय आणि दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून ही कारवाई केली जात आहे. दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटरचा पुरवठा, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि चालू करण्यासाठी निविदा देताना कंपनीला फायदा दिला, असा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

तसेच, दिल्ली जल बोर्डाचे तत्कालीन मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा यांनी मेसर्स एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 38 कोटी रुपयांची निविदा दिली होती. मात्र, तरीही कंपनीने आवश्यक निकषांची पूर्तता केली नाही. अलीकडेच ईडीने पीएमएलएच्या आरोपावरून अरोरा आणि अनिल कुमार अग्रवाल यांना 31 जानेवारी रोजी अटक केली होती. एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बनावट कागदपत्रे सादर करून निविदा जिंकल्या, असा आरोप ईडीच्या तपासात लावण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in