हरयाणात आजी, माजी आमदारांवर ईडीचे छापे

यमुनानगर, सोनीपत, कर्नाल येथील दोन राजकारण्यांची आणि संबंधित संस्थांच्या २० ठिकाणांचा मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार शोध घेतला जात
हरयाणात आजी, माजी आमदारांवर ईडीचे छापे
Published on

चंदिगड : यमुना नगर जिल्ह्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील एक भाग म्हणून सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंदर पनवार, माजी आयएनएलडीचे आमदार दिलबाग सिंह आणि अन्य काहीं व्यक्तींच्या ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

यमुनानगर, सोनीपत, कर्नाल येथील दोन राजकारण्यांची आणि संबंधित संस्थांच्या २० ठिकाणांचा मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार शोध घेतला जात आहे, असे ते म्हणाले. पनवार हे सोनीपतमधून हरयाणा विधानसभेचे सदस्य आहेत, तर सिंग यांनी इंडियन नॅशनल लोक दलाकडून (आयएनएलडी) यमुनानगर जागेचे प्रतिनिधित्व केले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरण हे हरयाणा पोलिसांच्या अनेक एफआयआरमधून दिसून येते. ज्या ठिकाणी भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर व न्यायालयाच्या आदेशानंतरही यमुनानगर तसेच जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये भूतकाळात झालेल्या बोल्डर्स, रेव आणि वाळूच्या कथित बेकायदेशीर उत्खननाच्या चौकशीसाठी हे एफआयआर नोंदवले गेले. ईडी 'ई-रावन' योजनेतील कथित फसवणुकीची चौकशी करत आहे, हे ऑनलाईन पोर्टल २०२० मध्ये हरयाणा सरकारने रॉयल्टी आणि करांचे संकलन सुलभ करण्यासाठी आणि खाण क्षेत्रातील कर चुकवणे टाळण्यासाठी हे पोर्टल आणले होते.

logo
marathi.freepressjournal.in