नॅशनल हेराल्डवर ईडीची छापेमारी; १२ ठिकाणांची घेतली झडती

ईडी’ची कारवाई सुरू असतानाच राहुल सोशल मीडियावर म्हणाले, “स्वतःला एकटे समजू नका. काँग्रेस तुमचा आवाज आहे
नॅशनल हेराल्डवर ईडीची छापेमारी; १२ ठिकाणांची घेतली झडती
Published on

ईडी’ने मंगळवारी ‘नॅशनल हेराल्ड’च्या दिल्लीस्थित कार्यालयासह १२ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. ‘ईडी’ने नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया व राहुल गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राहुल गांधींनी एका पोस्टद्वारे सरकारवर लक्ष्य केले आहे. “काँग्रेस तुमची आहे. तुम्ही काँग्रेसची ताकद आहात. आम्ही हुकूमशहाच्या प्रत्येक आदेशाविरोधात लढणार,” असे ते म्हणाले. ‘नॅशनल हेराल्ड’च्या चौथ्या मजल्याची ‘ईडी’कडून झडती घेण्यात आली. याच मजल्यावर वृत्तपत्राचे कार्यालय आहे.

हुकूमशहाच्या आदेशांविरोधात लढणार - राहुल गांधी

‘ईडी’ची कारवाई सुरू असतानाच राहुल सोशल मीडियावर म्हणाले, “स्वतःला एकटे समजू नका. काँग्रेस तुमचा आवाज आहे. तुम्ही काँग्रेसची ताकद आहात. हुकूमशहाचे प्रत्येक फर्मान, जनतेचा आवाज दाबण्याच्या प्रत्येक निर्णयाविरोधात आपल्याला लढायचे आहे. तुमच्यासाठी मी व काँग्रेस पक्ष लढत असून, भविष्यातही लढणार आहोत.”

logo
marathi.freepressjournal.in