रेझर पे, पेटीएम आणि कॅश फ्री या कंपन्यांवर ‘ईडी'चे छापे; १७ कोटी जप्त

भारतीय नागरिकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांना डमी संचालक बनवून बेकायदेशीर उत्पन्न मिळवत होत्या.
 रेझर पे, पेटीएम आणि कॅश फ्री या कंपन्यांवर ‘ईडी'चे छापे; १७ कोटी जप्त
Published on

झटपट कर्ज देणाऱ्या चिनी कर्ज ॲपशी संबंधित प्रकरणात ‘ईडी’ने बंगळुरूतील ऑनलाइन पेमेंट गेटवे असलेल्या रेझर पे, पेटीएम आणि कॅश फ्री या कंपन्यांवर छापे टाकले. या कारवाईत मर्चंट आयडी आणि चिनी लोकांच्या बँक खात्यांमध्ये ठेवलेले १७ कोटी रुपये ‘ईडी’ने जप्त केले आहेत.

‘ईडी’च्या म्हणण्यानुसार, संबंधित कंपन्या भारतीय नागरिकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांना डमी संचालक बनवून बेकायदेशीर उत्पन्न मिळवत होत्या. तसेच या संस्थांवर चीनमधील लोकांचे नियंत्रण असल्याचेही ‘ईडी’ने म्हटले आहे. या संस्था पेमेंट गेटवे आणि विविध मर्चंट आयडी आणि बँकांमध्ये ठेवलेल्या खात्यांद्वारे संशयास्पद आणि बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. बंगळुरूतील सायबर क्राइम पोलीस स्टेशनने नोंदवलेल्या १८ एफआयआरनुसार ‘ईडी’ने बंगळुरूत सहा ठिकाणी छापे टाकले. तपासादरम्यान ‘ईडी’ने १७ कोटी रुपयांची संशयास्पद रक्कम जप्त केली. ‘ईडी’ला अशा पद्धतीने कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ३६५ ॲप्सवर संशय आहे. या ॲप्सद्वारा साधारणपणे ८०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय आहे.

logo
marathi.freepressjournal.in