गोव्यात मनी लाँड्रिंग संबंधात बेकायदेशीरपणे हडपलेल्या ३१ जमिनी ईडीच्या कारवाईत जप्त

मालमत्तांच्या स्थानिक किंमतीनुसार ही किंमत ३९.२४ कोटी रुपये इतकी असून त्यांच्या जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
गोव्यात मनी लाँड्रिंग संबंधात बेकायदेशीरपणे हडपलेल्या ३१ जमिनी ईडीच्या कारवाईत जप्त

नवी दिल्ली : गोव्यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीरपणे जमिनी संपादणाऱ्या काही लोकांविरोधात मनी लाँड्रिंगच्या प्रकरणातील तपासणीच्या दरम्यान केलेल्या कारवाईत ३१ जमिनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिली.

मालमत्तांच्या स्थानिक किंमतीनुसार ही किंमत ३९.२४ कोटी रुपये इतकी असून त्यांच्या जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी आणि अन्य काहींचा समावेश या प्रकरणात आहे. गोवा पोलिसांनी यांच्या विरोधात विविध एफआयआरही दाखल केलेले आहेत. गोवा राज्यात बेकायदेशीरपणे त्यांनी जमिनी हडपल्याची प्रकरणे आहेत.

ईडीने म्हटले की, या संबंधातील तपासामध्ये असेही आढळून आले की, आरोपींनी त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या सहकारी वा नातेवाईकांच्या नावे विविध जमिनी बेकायदेशीरपणे हडपल्या होत्या, स्थावर मालमत्ता त्यांच्या पूर्वजांच्या मालकीच्या असल्याच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी आरोपींनी जमिनीच्या नोंदींमध्ये खोटी कागदपत्रे ठेवली, असेही त्यात म्हटले आहे.

या बनावट दस्तावेजांच्या आधारे ते उत्तराधिकारी म्हणून वा वारस म्हणून कामे करीत. तसेच त्यातून चे यादी तयार करून त्यांची नावे अद्ययावत किंवा जमिनीच्या नोंदींमध्ये समाविष्ट करू शकले. यापैकी काही बेकायदेशीरपणे मिळवलेल्या मालमत्ता आरोपींनी गोवा आणि इतर राज्यांतील खरेदीदारांना विकल्याचा दावाही ईडीने केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in