फारुख अब्दुल्ला यांना ‘ईडी’चे समन्स

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये मनी लॉँड्रिंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे
फारुख अब्दुल्ला यांना ‘ईडी’चे समन्स

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये मनी लॉँड्रिंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. अब्दुल्ला यांना मंगळवारी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अब्दुल्ला यांना ११ जानेवारी रोजी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. मात्र ते हजर झाले नाहीत. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील गैरव्यवहार केल्याप्रकरणी ‘ईडी’मार्फत चौकशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in