तेजस्वी यादव, लालू प्रसाद यांना ईडीचे समन्स 
PM

तेजस्वी यादव, लालू प्रसाद यांना ईडीचे समन्स 

या संबंधात अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितूनुसार तेजस्वी यादव यांना २२ डिसेंबरला तर लालूप्रसाद यादव यांना २७ डिसेंबरला उपस्थित राहाण्यासाठी सांगितले आहे.

नवी दिल्ली : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुथ लालूप्रसाद यादव यांना सक्त अंमलबजावणी संचालनालयाने रेल्वेतील जमीन-नोकरीसाठी मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजाविले आहे.

या संबंधात अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितूनुसार तेजस्वी यादव यांना २२ डिसेंबरला  तर लालूप्रसाद यादव यांना २७ डिसेंबरला उपस्थित राहाण्यासाठी सांगितले आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांचे जबाब यावेळी नोंदविण्यात येणार आहेत. हा कथित घोटाळा यूपीए-१ सरकारमध्ये लालूप्रसाद रेल्वेमंत्री असतानाच्या काळाशी संबंधित आहे.

यामध्ये असा आरोप आहे की, २००४ ते २००९ दरम्यान भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप "डी" पदांवर अनेक लोकांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या बदल्यात या लोकांनी त्यांची जमीन तत्कालीन रेल्वे मंत्री प्रसाद यांच्या कुटुंबीयांना आणि एक संलग्न कंपनी ए के इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड यांना हस्तांतरित केली.

logo
marathi.freepressjournal.in