खाद्यतेलाच्या किमतीत घसरण सुरु,महागाई कमी होण्याची चिन्हे

सर्व प्रमुख खाद्यतेलाच्या ब्रँड्सनी १०-१५ रुपयांनी किमती कमी केल्या आहेत
खाद्यतेलाच्या किमतीत घसरण सुरु,महागाई कमी होण्याची चिन्हे

वनस्पती, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि आरबीडी पामोलिनचे घाऊक आणि किरकोळ दर आठवड्याभरात कमी झाले आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्या आणखी कमी होतील. भारतीय ग्राहकांना खाद्यतेलासाठी कमी पैसे द्यावे लागू शकतील. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी नवी दिल्लीत सांगितले.

पांडे म्हणाले, “सर्व प्रमुख खाद्यतेलाच्या ब्रँड्सनी १०-१५ रुपयांनी किमती कमी केल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, विभागाकडून नियमित देखरेख , सर्व हितधारकांसोबत निरंतर सहभाग आणि सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत घट झाली आहे.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सहसचिव पार्थ एस दास म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे १५६ आणि ८४ कंपन्यांवर धडक मोहीम राबवून तपासणी करण्यात आली. ते म्हणाले की या तपासणीचा प्रतिबंधात्मक परिणाम झाला , कारण अचानक तपासणीमुळे दोषी कंपन्यांची संख्या दुसऱ्या टप्य्यात कमी झाली. पहिल्या टप्प्यात ५३आणि दुसऱ्या टप्प्यात १२कंपन्या तपासणी दरम्यान केंद्रीय साठा नियंत्रण व्यवस्थेत दोषी आढळल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in