नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल सहावे समन्स बजावून १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक समन्स पाठवले आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना सहावे समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आतापर्यंतचे हे सहावे समन्स आहे. मात्र अरविंद केजरीवाल एकदाही चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले नाहीत. याबाबत नुकतीच ईडीने न्यायालयात धाव घेतली होती.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना पाच समन्स पाठवण्यात आले आहेत.