शैक्षणिक साहित्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बाप्पाचा आशीर्वाद : समीर म्हात्रे

सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
शैक्षणिक साहित्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बाप्पाचा आशीर्वाद : समीर म्हात्रे

नुकताच गणेशोत्सव जरी पार पडला असला तरी या गणेशोत्सवादरम्यान सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने त्यांचाच एक अंग असणाऱ्या सहयाद्री विदयार्थी अकादमीने जी प्रसाद म्हणून शालेय साहित्य बाप्पाच्या दर्शनासाठी येताना घेउन येण्याची साद दिली होती, त्याला हातभार म्हणून पेणमध्ये हा उपक्रम राबविला होता.या अकादमीने जे गणेशभक्त एकमेकांच्या घरी विराजमान असणाऱ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात त्या गणेशभक्तांनी हार तुरे, फळे, मिठाई नेतनाच आपल्याला जमेल तसे शैक्षणिक साहित्य नेऊन बाप्पासमोर ठेवावे असे आवाहन केले होते. हे शैक्षणिक साहित्य पेणमधुन सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने एकत्र करून गरीब आणि गरजू अशा विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविला होता.या उपक्रमाचा एक भाग म्हणून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज काही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केले. यावेळी हे साहित्य वाटप करताना सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीर म्हात्रे, तालुका अध्यक्ष केतन म्हात्रे, उपाध्यक्ष रोहित केणी, माजी तालुका अध्यक्ष रोशन टेमघरे, साईराज कदम, स्वप्नील म्हात्रे, विनोद म्हात्रे, नितीन म्हात्रे आदी प्रतिष्ठानचे मावळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना समीर म्हात्रे यांनी आम्ही वाटप केलेले हे शैक्षणिक साहित्य म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी बाप्पाचा आशीर्वाद आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे हे साहित्य म्हणजे बाप्पाचा प्रसाद म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेउन आलो आहोत. या साहित्याचा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी चांगला वापर करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरीमध्ये रुजू होण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन समीर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. आज सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने पेण तालुक्यातील अराव, निंबारवाडी, शेडाशी, पाचगणी आणि वेताळपट्टी या पाच शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना वहीत, पेन्सिल,पेन, शोपनर, खोडरबर आदी शालेय साहित्य वाटप केले.यावेळी चंडीकादेवी माध्यमिक विद्यामंदिर आराव शाळेचे मुख्याध्यापक चोरमले, निंबारवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय कंक, पाचगणी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना राऊत, वेताळपट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव काळात ज्या ज्या गणेशभक्तांनी विद्यार्थ्यांसाठी जे शालेय साहित्य प्रसाद म्हणून बाप्पासमोर अर्पण केले होते त्या सर्व गणेशभक्तांचे सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने आभार मानले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in