एल निनो, युद्धामुळे महागाई वाढणार; बँक ऑफ बडोदा, प्रभुदास लीलाधरचा महागाई वाढण्याबाबत धोक्याचा इशारा

चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सहामाहीत भारतातील महागाई रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांपेक्षा जास्त वाढण्याची दाट शक्यता आहे. ‘एल निनो’चा प्रभाव आणि भू-राजकीय तणावामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी एकत्र आल्याने महागाईचा दर ६ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता प्रभुदास लीलाधर या ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात ही भीती वर्तवली आहे.
एल निनो, युद्धामुळे महागाई वाढणार; बँक ऑफ बडोदा, प्रभुदास लीलाधरचा महागाई वाढण्याबाबत धोक्याचा इशारा
एल निनो, युद्धामुळे महागाई वाढणार; बँक ऑफ बडोदा, प्रभुदास लीलाधरचा महागाई वाढण्याबाबत धोक्याचा इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सहामाहीत भारतातील महागाई रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांपेक्षा जास्त वाढण्याची दाट शक्यता आहे. ‘एल निनो’चा प्रभाव आणि भू-राजकीय तणावामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी एकत्र आल्याने महागाईचा दर ६ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता प्रभुदास लीलाधर या ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात ही भीती वर्तवली आहे. अपुरा पाऊस, जलाशयांमधील पाण्याचा कमी साठा आणि कच्च्या तेलाशी संबंधित वाढत्या किमती या आगामी काळातील मुख्य अडचणी असल्याचे फर्मने १२ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात नमूद केले आहे.

भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट या दोन्ही संस्थांनी या मान्सूनमध्ये एल निनोचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवला असून स्कायमेटने तो ९४ टक्के राहण्याचा अंदाज जाहीर केला आहे. जून महिन्यातील पाऊस सरासरीच्या ९२ टक्के राहण्याची शक्यता असून ऑगस्टमध्ये पाऊस आणखी कमकुवत होऊ शकतो. देशाच्या उत्तर, पश्चिम आणि मध्य भागात पावसाची तूट राहण्याची शक्यता जास्त आहे, तर पूर्व आणि ईशान्य भारतात परिस्थिती तुलनेने चांगली असू शकते. यंदा जलाशयांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी आहे.

अहवालानुसार तीव्र उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे. उत्तम सिंचन व्यवस्थेमुळे एल निनोचा उत्पादनावरील परिणाम काही प्रमाणात कमी झाला असला, तरी भूतकाळात २००३, २००५ आणि २०१० या आर्थिक वर्षांमध्ये खरीप उत्पादनात अनुक्रमे २२ टक्के, ११.७ टक्के आणि १२ टक्क्यांची घट झाली होती. अलीकडच्या काळातील एल निनो वर्षांचा विचार केल्यास २०१६ मध्ये उत्पादन २.३ टक्क्यांनी घटले होते.

अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता

बँक ऑफ बडोदाचा ताजा महागाईविषयक संशोधन अहवाल १४ जून २०२६ रोजी प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार, मे २०२६ मधील हेडलाइन किरकोळ महागाई (CPI) ३.९ टक्के नोंदवली गेली असून, खराब हवामानामुळे (उदा. एल निनो) अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in