ला-निना तटस्थ; भारतात यंदा मान्सूनचा अंदाज लागेना!

भारतातील मौसमी पावसासाठी आवश्यक असलेला 'ला-निना' प्रवाह समाप्त झाल्याची घोषणा अमेरिकेच्या सरकारी संस्थांनी केली. जगातील सर्वात मोठा महासागरातील 'ला-निना' प्रवास यंदाच्या हिवाळ्यापर्यंत 'तटस्थ' राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मान्सूनचा अंदाज लावणे कठीण बनले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रपीटीआय
Published on

नवी दिल्ली: भारतातील मौसमी पावसासाठी आवश्यक असलेला 'ला-निना' प्रवाह समाप्त झाल्याची घोषणा अमेरिकेच्या सरकारी संस्थांनी गुरुवारी रात्री केली. जगातील सर्वात मोठा महासागरातील 'ला-निना' प्रवास यंदाच्या हिवाळ्यापर्यंत 'तटस्थ' राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मान्सूनचा अंदाज लावणे कठीण बनले आहे.

'ला-निना' तटस्थ राहिल्याने भारताच्या मान्सूनसाठी ही चांगली बातमी असू शकते. यामुळे अधिक पाऊस किंवा दुष्काळाची शक्यता कमी होते. परंतु पावसाचा अंदाज लावणे कठीण बनते.

ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ला-निना संपल्याने पावसाचा अंदाज करणे कठीण बनले आहे. कारण हिंद महासागरातही कमीत कमी ऑगस्टपर्यंत परिस्थिती 'तटस्थ' राहील. प्रशांत महासागराबरोबरच महासागरातील हिंद पृष्ठभागावरील तापमान हे भारतातील पावसात मुख्य भूमिका बजावते. महासागरातील 'सकारात्मक' प्रवाह जेव्हा प. हिंद महासागराचे पाणी पूर्वेच्या तुलनेत अधिक गरम होते तेव्हा पाऊस वाढतो. प्रशांत महासागरासाठी अमेरिकेच्या हवामान खात्याने सांगितले की, सप्टेंबरपर्यंत परिस्थिती 'तटस्थ' राहण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

१२ वर्षांत पहिल्यांदाच घडले

यंदा १२ वर्षांत पहिल्यांदाच मान्सूनपूर्वी व नंतर 'एल-निनो' किंवा 'ला-निना' नसेल. प्रशांत महासागरातील हे दोन प्रवाह हवामानासाठी महत्त्वपूर्ण ठरते. जून ते सप्टेंबर दरम्यान किती पाऊस पडेल हे प्रवाह ठरवतात.

भारतीय हवामान खात्याचे मान्सूनचे माजी शास्त्रज्ञ राजीवन म्हणाले की, 'ला-निना' तटस्थ असताना मान्सूनचा अंदाज लावणे कठीण आहे. हवामान शास्त्रज्ञांना आता अधिक सावध राहावे लागेल. अटलांटिक महासागरातील परिस्थितीवर बारीक नजर ठेवावी लागेल. अंतर्गत प्रवाह एक भूमिका पार पाडू शकते.

दरम्यान, खासगी हवामान संस्था 'स्कायमेट' ने यंदा पाऊस दीर्घकाळासाठी १०३ टक्के होण्याची शक्यता वर्तवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in