एल निनोमुळे किंमतवाढ; कुटुंबांना फटका बसण्याची 'एस अँड पी'ला भीती

भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यांसारख्या आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अर्थव्यवस्थांमध्ये किमतीत प्रचंड वाढ होत आहे. त्यातच एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या हवामान बदलांच्या आणि पुरवठ्यातील अडथळ्यांच्या फटक्याला या भागातील कुटुंब मोठ्या प्रमाणावर बळी पडू शकतात, असा इशारा 'एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स'ने दिला आहे.
एल निनोमुळे किंमतवाढ; कुटुंबांना फटका बसण्याची 'एस अँड पी'ला भीती
एल निनोमुळे किंमतवाढ; कुटुंबांना फटका बसण्याची 'एस अँड पी'ला भीती'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यांसारख्या आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अर्थव्यवस्थांमध्ये किमतीत प्रचंड वाढ होत आहे. त्यातच एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या हवामान बदलांच्या आणि पुरवठ्यातील अडथळ्यांच्या फटक्याला या भागातील कुटुंब मोठ्या प्रमाणावर बळी पडू शकतात, असा इशारा 'एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स'ने दिला आहे.

एस अँड पीने म्हटले आहे की, २०२६ पासून सुरू होणाऱ्या एल निनो कालावधीचे परिणाम आशिया-पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने कमी पाऊस आणि हवामानातील बदलांच्या रूपाने दिसतील; मात्र त्याचा स्थूल आर्थिक प्रभाव नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.

शेतीचे कमी होणारे उत्पन्न, अन्नाची वाढती महागाई, जलविद्युत निर्मितीत होणारी घट तसेच जंगलांना लागणारे वणवे आणि धुक्याची समस्या हे याचे मुख्य दुष्परिणाम ठरतील.

पुरवठ्यातील अडथळे कमी करण्यासाठी अनेक देशांनी अन्नधान्याचा राखीव साठा वाढवला आहे, आयात नियोजनात सुधारणा केली आहे आणि बाजार नियंत्रण यंत्रणा मजबूत केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in