राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा निवडणुकीबद्दल आयुक्त म्हणाले, "आम्ही घाई करणार..."

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीबद्दल निवडणूक आयोगाने भूमिका केली स्पष्ट
राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा निवडणुकीबद्दल आयुक्त म्हणाले, "आम्ही घाई करणार..."

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरात मोठा राजकीय वाद सुरु झाला. याचवेळी राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आलेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार का? असा प्रश्न विचारण्यात येत होता. यावरून आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांना वायनाड लोकसभा निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यासाठी आमच्याकडे आणखी ६ महिन्यांचा कालावधी आहे. आत्ताच आम्ही घाई करणार नसून राहुल गांधींकडे अपील करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी आहे." असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे इतक्यात तरी वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मोदी आडनाव मानहानी प्रकरणामध्ये राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून खासदारकी रद्द करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in