मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचे ‘ई-साइन’ फिचर; राहुल गांधींच्या आरोपांनंतर घेतला निर्णय

मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आपल्या पोर्टल आणि अ‍ॅपवर नवे ‘ई-साइन’ फिचर सुरू केले आहे. यामुळे मतदार नोंदणी, नाव वगळणे किंवा दुरुस्ती अर्ज करताना आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरद्वारे ओळख पडताळणी करावी लागणार आहे.
मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचे ‘ई-साइन’ फिचर; राहुल गांधींच्या आरोपांनंतर घेतला निर्णय
Published on

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवरून रान उठविल्यानंतंर आता निवडणूक आयोगाने आपल्या पोर्टल आणि अ‍ॅपवर नवे ‘ई-साइन’ फिचर सुरू केले आहे. याअंतर्गत मतदार म्हणून नोंदणी करणे, नाव वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या ‘आधार’शी जोडलेल्या फोन नंबरचा वापर करून स्वतःची ओळख पटवावी लागणार आहे.

यापूर्वी अर्जदार आपला फोन नंबर विद्यमान मतदार फोटो ओळखपत्र (ईपीआयसी) क्रमांकाशी जोडून निवडणूक आयोगाच्या अ‍ॅप किंवा पोर्टलवर फॉर्म भरू शकत होते, पण त्यामधील माहिती खरी आहे की नाही, ती माहिती त्यांचीच आहे का नाही याची पडताळणी होत नव्हती.

logo
marathi.freepressjournal.in