जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका; जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देणार - मोदी

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. तसेच जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळू शकतो, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीFPJ

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. तसेच जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळू शकतो, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी हे पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर पोहचले आहेत.

ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर लवकरच आपले भविष्य अधिक उज्ज्वल बनवेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या जनतेने व्यापक सहभाग घेतला. आता जम्मू-काश्मीरचे लोक आपले सरकार लवकरच निवडतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवारी येथे आगमन झाले असून ते १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन अथवा पायाभरणी करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in