श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी सुरु

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी सुरु

दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली असून त्यात ३० जण जखमी झाले, तर १ आंदोलक ठार झाला आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले आहेत. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर श्रीलंकन नागरिकांचा संताप उफाळून आला असून राजधानी कोलंबोच्या रस्त्यांवर आंदोलक प्रचंड दंगली करत आहेत. जनतेचा तीव्र विरोध पाहून पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली आहे.

हजारो लोक संसद भवनाकडे कूच करत आहेत. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झडत आहे. दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली असून त्यात ३० जण जखमी झाले, तर १ आंदोलक ठार झाला आहे.

विक्रमसिंघे सध्या अज्ञातस्थळी

श्रीलंकेचे कार्यवाह राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेतील सद्य:स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संरक्षण दलाचे प्रमुख, त्रिदल कमांडर आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. विक्रमसिंघे हे सध्या अज्ञातस्थळी आहेत. ते देशामध्येच असून आदेश आणि संदेश जारी करत आहेत. तत्पूर्वी, आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानालाही आग लावली होती आणि बुधवारी पंतप्रधान कार्यालयावरही ताबा मिळवला. आंदोलकांनी राष्ट्रीय टीव्ही ‘रूपवाहिनी’चा स्टुडिओ ताब्यात घेतल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. तथापि, आंदोलकांनी नंतर एक निवेदन जारी केले की त्यांनी राष्ट्रीय टीव्हीवर कब्जा केलेला नाही. रुपवाहिनी अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच स्टुडिओत प्रवेश केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे प्रसारित करण्याची विनंती त्यांनी केली होती, असा त्यांचा दावा आहे. त्यानंतर १५ मिनिटांचा स्क्रीनटाइम देण्यात आला. मात्र, आता रूपवाहिनीचे प्रसारण पुन्हा सुरू झाले आहे.

आंदोलकांची भारताकडे हस्तक्षेपाची मागणी

आंदोलकांनी या प्रकरणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांवर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवाई गोळीबार करावा लागला. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील स्थिती हाताळण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा,

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in