मोठी दुर्घटना टळली! तांत्रिक कारणाने उड्डाणानंतर 20 मिनिटांत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

या विमानात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्यासह दिब्रुगडचे आमदार प्रशांत फुकन आणि दुनियाजनचे आमदार तेरेश ग्वाला हे देखील प्रवास करत होते.
मोठी दुर्घटना टळली! तांत्रिक कारणाने उड्डाणानंतर 20 मिनिटांत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाचं तांत्रिक कारणामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. या विमानात केंद्रीय मंत्री तसंच आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. आसामच्या गुवाहाटीमधून दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाने रविवार (4 जून) ला सकाळी उड्डाण केलं. परुंतू काही तांत्रिक कारणांमुळे उड्डाण केल्यानंतर वीस मिनीटांत विमानतळावर पुन्हा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. आसमाच्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलाई विमानतळावर हे इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं आहे. या विमानात केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्यासोबत दोन आमदार प्रवास करत असल्याचं सांगितलं जात आहे. विमान लँडिंग करण्याचा निर्णय योग्य वेळेत घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

आसामच्या गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलाई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर तांत्रिक कारणास्तव उड्डाणानंतर 20 मिनिटात पुन्हा गुवाहाटीला आणण्यात आलं. विमानाचं लँडिंग केल्यानंतर विमानात असलेले आमदार प्रशांत फूकन यांनी तांत्रिक कारणाने विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच विमानात असलेले सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं देखील फूकन म्हणाले.

या विमानात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्यासह दिब्रुगडचे आमदार प्रशांत फुकन आणि दुनियाजनचे आमदार तेरेश ग्वाला हे देखील प्रवास करत होते. तसंच इतर प्रवासी देखील विमानात प्रवास करत होते. या घटनेविषयी बोलताना आमदार प्रशांत फूकन यांनी सांगितलं की, "गुवाहाटीवरुन उड्डाण करताना कोणतीही अडचण आली नाही. परंतु 20 मिनिटांनी विमान परत आणण्यात आलं. विमानात काही तांत्रिक समस्या असल्याचं एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी कळवलं." विमानाचे सुखरुप लँडिंग झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती त्यांच्याद्वारे देण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in