सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दिला संपावर जाण्याचा इशारा

आठवड्यात कामकाजाचे पाच दिवस आणि पेन्शनशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटना संपावर जाणार आहेत
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दिला संपावर जाण्याचा इशारा

येत्या २७ जून रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स या कर्मचारी संघटनांसह एकूण नऊ बँक संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आठवड्यात कामकाजाचे पाच दिवस आणि पेन्शनशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटना संपावर जाणार आहेत. एआयबीईएचे महासचिव सी.एच. वेंकटचलम यांनी यूएफबीयूच्या बैठकीनंतर सांगितलं की, 'सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन योजनेत सुधारणा करणं, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करणे आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे.'

जून महिन्यात देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका आठ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सहा नियमित साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे तर प्रादेशिक सणांच्या निमित्ताने दोन दिवस बँका बंद असणार आहेत. देशातील सर्व बँकांसाठी नियम आणि सुट्ट्या ठरवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in