एन्काउंटर झालेल्या गुलामची म्हणाली, "युपी सरकारने जे केले..."

उमेश पाल हत्येप्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात डॉन अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काउंटर केला, त्याच्यासोबत सहआरोपी शुटर गुलामचा देखील एन्काउंटर केला
एन्काउंटर झालेल्या गुलामची म्हणाली, "युपी सरकारने जे केले..."

उत्तर प्रदेशमधील झाशी येथे उत्तर प्रदेश एसटीएफने कुख्यात डॉन अतिक अहमदचा धाकटा मुलगा असद अहमद आणि त्याच्यासोबत शुटर गुलाम याचा एन्काउंटर केला. गेले काही दिवस या एन्काउंटरची जोरदार चर्चा देशभरात रंगली आहे. हे दोघेही उमेश पाल हत्याप्रकरणात आरोपी होते. यांनतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात येणार आहेत. मात्र, शुटर गुलामच्या आईने आणि भावाने त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.

शुटर गुलामाची आई खुशनुदा यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, "उत्तर प्रदेश सरकारने जे काही केले, त्यात चुकीचे काही नाही. जे जे लोक वाईट कामे करतात, त्यांना हे आयुष्यभर लक्ष राहणार आहे. एखाद्याची हत्या करून तुम्ही चूक केली. त्यामुळेच तुमच्यावर वाईट वेळ आली. या गोष्टीला आम्ही वाईट कसे म्हणू शकतो? आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही. गुलामच्या पत्नीचा त्याच्यावर हक्क असून आम्ही तिला नाकारू शकत नाही." असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडियो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in