"त्या दिवशी आईचा फोन 24 तास वाजत होता", शार्क टँक इंडिया 3 पॅनलमधील शार्क अजहर इक्बाल यांनी सांगितला हृदयस्पर्शी प्रसंग

शार्क टँक इंडिया हा बिझनेस रिअ‍ॅलिटी टेलिव्हिजन शो तिसर्‍या सीझनसह परतणार आहे. हा शो 22 जानेवारीपासून सोनी टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे.
"त्या दिवशी आईचा फोन 24 तास वाजत होता", शार्क टँक इंडिया 3 पॅनलमधील शार्क अजहर इक्बाल यांनी सांगितला हृदयस्पर्शी प्रसंग

शार्क टँक इंडिया हा बिझनेस रिअ‍ॅलिटी टेलिव्हिजन शो तिसर्‍या सीझनसह परतणार आहे. हा शो 22 जानेवारीपासून सोनी टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या मागील दोन सीझनमध्ये अनेक नवोदित उद्योजक होते, ज्यांना व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवायचे होते. शार्क टँक इंडियाच्या आगामी सीझनने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सूकता निर्माण केली आहे.

यावेळी हा शो 12 जज उर्फ ​​शार्क, जे प्रत्येकजण आपापल्या उद्योगातील दिग्गज आहेत, त्यांच्या उपस्थितीसह सादर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त या शोमध्ये शार्कच्या भूमिकेत एक नवीन चेहरा दिसणार आहे. हा नवीन चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून इनशॉर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अजहर इक्बाल हे आहेत.

अजहर इक्बाल हे मूळचे बिहारच्या बहादुरगंज येथील आहेत. ETimes शी बोलताना ते म्हणाले की, "त्यांच्या समाजातील लोकांना त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल अजिबात माहिती नव्हती. “गेल्या 10 वर्षांपासून माझ्या गावातील लोकांना माझ्या कामाची माहिती नव्हती. त्यांच्यापैकी बहुतेकांसाठी माझ्याबद्दल एक गूढ आहे.'' शार्क टँक इंडियाच्या निर्मात्यांनी त्यांचा आणि शोमध्ये सहभागी झालेल्या इतरांचा फोटो शेअर केल्यानंतर गावकऱ्यांना त्यांच्या कामाची माहिती झाली, असेही ते म्हणाले.

शोचा प्रोमो लाइव्ह झाल्यानंतर त्यांच्या आईला खूप आनंद झाल्याचे इक्बाल यांनी सांगितले. आईने केलेल्या दाव्यानुसार, त्याआधी गावातील कोणालाही इक्बालचे नावही माहित नव्हते, परंतु, त्या दिवसानंतर तो लोकप्रिय झाला. प्रोमो लाईव्ह झाल्यानंतर २४ तास आईचा फोन वाजत होता. सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत होता. हा एक हृदयस्पर्शी क्षण असल्याचे इक्बाल म्हणाले.

"बिहारमधील एका लहान खेड्यातील एक मुलगा मोठी स्वप्ने पाहू शकतो याचा लोकांना अभिमान वाटला", असेही इक्बाल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in