वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये ‘हनुमान कढई’ची नोंद

नागपूरमधील लोकप्रिय प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आयोध्यातील राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठी कढई बनवली आहे
वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये ‘हनुमान कढई’ची नोंद

मुंबई : वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया या संस्थेकडून जगातील प्रतिभावंत तसेच कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रेकॉर्डच्या माध्यमातून व्यासपीठ देण्याचे काम अविरतपणे केले जात आहे. नागपूरमधील लोकप्रिय प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आयोध्यातील राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठी कढई बनवली आहे. ही कढई सुमारे साडेसहा फूट उंच असून तिचा व्यास १५ फूट आहे.

तसेच ह्या कढईचे वजन १८०० किलो असून त्यासाठी ६ एमएम. आकाराची स्टील शीट वापरली गेली आहे. त्यामुळेच ह्या जगातल्या विशाल कढईचे नाव ‘हनुमान कढई’ म्हणून ठेवण्यात आलेले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांनी त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी साठी त्यांना सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in