पीएफचे व्याज जमा होण्यास अखेर सुरुवात; पुढील आठवड्यापर्यंत सभासदांना पाहता येणार अपडेट

सेवानिवृत्ती निधी संस्था 'ईपीएफओ' आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या भविष्य निर्वाह निधीवरील (प्रॉव्हिडंट फंड) व्याज जमा करण्याची प्रक्रिया करत असून, सभासद १५ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने ही अपडेट केलेली रक्कम तपासू शकतात, अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविय यांनी बुधवारी दिली.
पीएफचे व्याज जमा होण्यास अखेर सुरुवात; पुढील आठवड्यापर्यंत सभासदांना पाहता येणार अपडेट
पीएफचे व्याज जमा होण्यास अखेर सुरुवात; पुढील आठवड्यापर्यंत सभासदांना पाहता येणार अपडेट
Published on

नवी दिल्ली : सेवानिवृत्ती निधी संस्था 'ईपीएफओ' आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या भविष्य निर्वाह निधीवरील (प्रॉव्हिडंट फंड) व्याज जमा करण्याची प्रक्रिया करत असून, सभासद १५ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने ही अपडेट केलेली रक्कम तपासू शकतात, अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविय यांनी बुधवारी दिली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) '२.०१ साईट्स' (सेंट्रलाइज्ड आयटी-इनेबल्ड सर्व्हिसेस) लागू केल्यामुळे प्रॉव्हिडंट फंड खात्यांचे ऑनलाइन ॲक्सेस सक्षम झाले आहे, असे मांडविय सांगितले.

'साईट्स' प्रकल्प हा सभासदांची सोय वाढवण्यासाठी, ईपीएफओची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि पारदर्शक व अखंड सेवा देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे ८.२५ टक्के दराने मिळणारे वार्षिक व्याज ३४ कोटी सभासदांच्या खात्यांवर जमा केले जाईल. अंदाजे १.४४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या या व्याजावर स्वयंचलित प्रक्रिया केली जाईल आणि सभासदांच्या खात्यात जमा होण्यापूर्वी क्षेत्र अधिकाऱ्यांद्वारे त्याची पडताळणी केली जाईल. सभासदांना १५ जुलैपर्यंत त्यांच्या पासबुकमध्ये हे जमा झालेले व्याज पाहता येईल, असे मंत्र्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात सरकारने भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली होती. मंत्र्यांच्या मते, पूर्वी सरकारच्या मंजुरीनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये व्याजाची प्रक्रिया केली जात असे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in