इथेनाॅलचा पर्याय? स्वयंपाकाच्या गॅससाठी सरकारची चाचपणी

स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी पेट्रोलियम उद्योगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आयात केल्या जाणाऱ्या महागड्या एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जैवइंधनाचा (बायोफ्युएल) विस्तार करण्यासाठी उद्योगातील सर्व घटकांनी पुढे यावे, असे आवाहन फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीतर्फे (एफआयपीआय) करण्यात आले आहे.
इथेनाॅलचा पर्याय? स्वयंपाकाच्या गॅससाठी सरकारची चाचपणी
इथेनाॅलचा पर्याय? स्वयंपाकाच्या गॅससाठी सरकारची चाचपणी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी पेट्रोलियम उद्योगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आयात केल्या जाणाऱ्या महागड्या एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जैवइंधनाचा (बायोफ्युएल) विस्तार करण्यासाठी उद्योगातील सर्व घटकांनी पुढे यावे, असे आवाहन फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीतर्फे (एफआयपीआय) करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात गॅस सिलिंडरला इथेनॉलवर चालणाऱ्या शेगड्यांचा सक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाच्या शेगड्या विकसित करण्यासाठी एलपीजी इक्विपमेंट रिसर्च सेंटर आणि विविध आयआयटी संस्थांमध्ये संशोधन सुरू असल्याची माहिती ‘एफआयपीआय’चे संचालक आर. एस. रवी यांनी दिली. ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनच्या (एआयडीए) परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, या शेगड्यांचे प्रोटोटाइप लवकरच तयार होतील. हे तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचवण्यासाठी केवळ निर्मिती पुरेशी नसून, इथेनॉल थेट घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मजबूत पुरवठा साखळी विकसित करणे हे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कच्च्या तेलाची आयात कमी करणे, परकीय चलन वाचवणे, शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणे या उद्देशाने केंद्र सरकार इथेनॉल वापराला प्रोत्साहन देत आहे. स्वयंपाकाच्या इंधनात हा प्रयोग यशस्वी झाल्यास ऊर्जा सुरक्षेमध्ये परिवर्तन घडून येईल.

आर. एस. रवी, संचालक, एफआयपीआय

logo
marathi.freepressjournal.in