विवाहित महिलेलाही आता ‘मिस युनिव्हर्स’ बनता येणार; ७० वर्षापूर्वीचा नियम बदलला

मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत प्रचंड मेहनत घेऊनही अपयश येते. तसेच वाढत्या वयामुळे महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येत नाही.
 विवाहित महिलेलाही आता ‘मिस युनिव्हर्स’ बनता येणार; ७० वर्षापूर्वीचा नियम बदलला
Published on

जगातील सुंदर महिला कोण, याचे उत्तर ‘मिस युनिव्हर्स’मध्ये मिळते. जगभरातील सुंदरी या स्पर्धेत सहभागी होतात. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लग्न न होणे ही पहिली अट होती. आता ती काढून टाकली असून विवाहित महिलेलाही आता ‘मिस युनिव्हर्स’ बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत प्रचंड मेहनत घेऊनही अपयश येते. तसेच वाढत्या वयामुळे महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येत नाही. आता लग्नानंतरही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे, असा नियम ‘मिस युनिव्हर्स’ ब्युटी कॉन्टेस्टने जारी केला आहे. त्यामुळे जगभरातील विवाहित सुंदर महिलांसाठी ही स्पर्धा अधिक व्यापक झाली आहे.

गेल्या ७० वर्षांपासून केवळ अविवाहित महिलांसाठी ही स्पर्धा होती. त्यात १८ ते २८ वयोगटातील महिला सहभागी होऊ शकत होत्या. तो नियम रद्द करण्याचा निर्णय यंदा घेतला गेला. हा नियम २०२३ पासून अमलात येणार आहे.

२०२० मध्ये हा ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा जिंकणाऱ्या मेक्सिकोच्या एंड्रियाने सांगितले की, “व्यक्तिगत पातळीवर मला आनंद झाला आहे. पूर्वी ‘मिस युनिर्व्हस’चे निकष ठरवण्याचा केवळ पुरुषांचा अधिकार होता. आता त्यात बदल करण्याची वेळ आली आहे.’’

logo
marathi.freepressjournal.in