एव्हरेस्ट, लालजीच्या हिंग पावडरवर बंदी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने प्रसिद्ध 'एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स' आणि 'लालजी गोधू अँड कंपनी'च्या 'हिंग पावडर'च्या विक्रीवर बंदी घातली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत या कंपन्यांचा हिंग निकृष्ट दर्जाचा आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एव्हरेस्ट, लालजीच्या हिंग पावडरवर बंदी
एव्हरेस्ट, लालजीच्या हिंग पावडरवर बंदी
Published on

नवी दिल्ली: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने प्रसिद्ध 'एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स' आणि 'लालजी गोधू अँड कंपनी'च्या 'हिंग पावडर'च्या विक्रीवर बंदी घातली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत या कंपन्यांचा हिंग निकृष्ट दर्जाचा आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राधिकरणाने सोशल मीडियाद्वारे या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे. प्राथमिक प्रयोगशाळेतील अन्न विश्लेषकांच्या तपासणी अहवालानुसार एव्हरेस्टच्या कंपाऊंडेड हिंग पावडरचे नमुने 'चुकीचे लेबलिंग आणि निकृष्ट दर्जाचे' आढळून आले आहेत.

'लालजी गोधू अँड कंपनी'चे कंपाऊंडेड हिंग पावडर आणि वडीचे नमुनेही निकृष्ट, भेसळयुक्त आणि विहित निकषांचे उल्लंघन करणारे आढळले आहेत. हिंग तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या हिंगामध्ये प्रमाणापेक्षा जास्त स्टार्चचे प्रमाण आढळले आहे. नियमानुसार हिंगात वजनाच्या १ टक्क्यापेक्षा जास्त स्टार्च असण्यास मनाई आहे.

प्राधिकरणाने दोन्ही कंपन्यांना निकृष्ट दर्जाच्या हिंगाची विक्री रोखण्यासाठी आणि एफएसएस कायदा, २००६ नुसार मानकांचे पालन करणारी उत्पादनेच तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी तत्काळ 'कृती आराखडा' सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जर कंपन्यांनी या त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या नाहीत, तर त्यांच्यावर अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in