भाजपचा प्रत्येक सहावा खासदार 'मतचोर'; राहुल गांधींचा हल्लाबोल

प्रत्येक लोकसभेतील सहाव्या भाजप खासदाराने 'मतचोरी' करून आपली जागा मिळवली आहे, असा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. तसेच, भाजपच्याच भाषेत त्यांना 'घुसखोर' म्हणावे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचा प्रत्येक सहावा खासदार 'मतचोर'; राहुल गांधींचा हल्लाबोल
भाजपचा प्रत्येक सहावा खासदार 'मतचोर'; राहुल गांधींचा हल्लाबोल
Published on

नवी दिल्ली : प्रत्येक लोकसभेतील सहाव्या भाजप खासदाराने 'मतचोरी' करून आपली जागा मिळवली आहे, असा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. तसेच, भाजपच्याच भाषेत त्यांना 'घुसखोर' म्हणावे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, जर आज देशात निष्पक्ष निवडणुका झाल्या, तर भाजप लोकसभेत १४० जागांचा टप्पाही पार करू शकणार नाही. राहुल गांधी यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, "मतचोरीच्या माध्यमातून कधी वैयक्तिक जागा चोरल्या जातात, तर कधी संपूर्ण सरकार, लोकसभेतील २४० भाजप खासदारांपैकी जवळपास प्रत्येक सहाव्या खासदाराने 'मतचोरी' करून जागा मिळवली आहे. त्यांना ओळखणे कठीण नाही. भाजपच्याच भाषेत आपण त्यांना 'घुसखोर' म्हणावे का, असा सवाल त्यांनी केला.

संपूर्ण सरकारच घुसखोर

हरयाणाबाबत बोलायचे तर तेथे संपूर्ण सरकारच 'घुसखोर' आहे. मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी ज्या संस्था त्यांनी आपल्या खिशात ठेवल्या आहेत, त्या स्वतःच 'रिमोट कंट्रोल' द्वारे चालवल्या जातात, असा हल्लाही राहुल यांनी चढविला. त्यांची खरी भीती ही सत्याची आहे. कारण जर निष्पक्ष निवडणुका घेतल्या गेल्या, तर ते आज १४० जागाही जिंकू शकणार नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

मतांची चोरी

मंगळवारी, राहुल गांधी यांनी बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाला 'मतांची चोरी' आणि भारतीय लोकशाहीला 'नष्ट' करण्याच्या भाजपच्या मिशनमधील एक मोठे पाऊल म्हटले होते. तसेच, त्यांनी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दर्शवला असून, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्यांना क्षुद्र राजकारण बाजूला ठेवण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in