आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार ईव्हीएममधील मतांची मोजणी

भारतीय निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीबाबतच्या नियमामध्ये बदल केला असून आता ईव्हीएम आणि व्हीहीपॅटमधील मतांच्या मोजणीचा दुसरा आणि अंतिम टप्पा हा पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू केला जाणार आहे.
आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार ईव्हीएममधील मतांची मोजणी
Published on

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीबाबतच्या नियमामध्ये बदल केला असून आता ईव्हीएम आणि व्हीहीपॅटमधील मतांच्या मोजणीचा दुसरा आणि अंतिम टप्पा हा पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू केला जाणार आहे. यापूर्वी ईव्हीएममधील मतांची मोजणी ही पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्यापूर्वीही पूर्ण होऊ शकत असे. हा बदल पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे.

मतदानादिवशी पोस्टल बॅलेटची मतमोजणी ही सकाळी ८ वाजता सुरू होते. तर ईव्हीएमची मोजणी ही ८.३० वाजता सुरू होते. आधी ईव्हीएमची मोजणी ही पोस्टल बॅलेटच्या मोजणीच्या कुठल्याही टप्प्यात सुरू राहत असे. तसेच ती आधी पूर्ण होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नव्हती. दरम्यान, आता ईव्हीएम/व्हीहीपॅटच्या मोजणीचा दुसरा टप्पा हा पोस्टल बॅलेटमधील मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतमोजणी प्रक्रियेमध्ये एकरूपता आणि अधिकाधिक स्पष्टता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. जेथे पोस्टल बॅलेटची मतमोजणी केली जाते विशेष करून तेथे हा बदल लागू केला जाणार आहे. या बदलामुळे सर्व मतांची मोजणी योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने आणि कुठल्याही गफलतीशिवाय पूर्ण झाली आहे हे निश्चित होणार आहे.

बिहार निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान भाजपचे प्रभारी, तर सी. आर. पाटील, मौर्य सहप्रभारी

भाजपने बिहार निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे, तर सी. आर. पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून, तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जय पांडा यांची तमिळनाडूचे प्रभारी, तर मुरलीधर मोहोळ यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. राजकीय पक्षांनी त्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा आहेत. एनडीए आणि महाआघाडीमध्ये प्रमुख लढत होणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सर्व पक्ष मैदानात प्रचाराला सुरुवात करत आहेत. आयोग साधारणत: ६ ऑक्टोबरच्या सुमारास बिहारच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार बिहारला भेट देणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या आगमनापूर्वी राज्याला बदली आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in