जयपूर : निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन जवळपास महिना उलटल्यानंतर शनिवारी राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. २२ भाजप आमदारांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात करणपूर विधानसभा मतदारसंघासाठी ५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह यांना शनिवारी राजस्थान सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील करण्यात आले, यावरून काँग्रेसने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे.
राज्यपाल कलराज मिश्रा यांनी येथील राजभवनात एका समारंभात शपथ दिली. यामध्ये १२ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून, तर पाच जणांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशी आणि पाच जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
सुरेंद्र पाल सिंह यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केल्याबद्दल भाजपवर निशाणा साधत काँग्रेसच्या राजस्थान युनिटचे प्रमुख गोविंद सिंग दोतासरा म्हणाले की, त्यांचा पक्ष हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणी करेल.
सकाळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राजभवनात मिश्रा यांची भेट घेतली आणि शपथविधी सोहळ्यासाठी त्यांची परवानगी मागितली, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
राजस्थानमधील करणपूर विधानसभेसाठी २५ नोव्हेंबर रोजी होणारे मतदान काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले. आता ५ जानेवारीला निवडणूक होणार असून तीन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहेत.
भाजपचा अहंकार शिगेला पोहोचला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचा अवमान केला आहे आणि करणपूरमधील उमेदवार सुरेंद्रपाल सिंह यांना पदाची शपथ देऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे दोतासरा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मतदानापूर्वी भाजपने आपल्या उमेदवाराला मंत्री बनवण्याची देशातील ही पहिलीच घटना असावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने या निवडणुकीसाठी रुपिंदर सिंग कुनर यांना उमेदवारी दिली आहे, जी पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे वडील गुरमीत सिंग कुनर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. करणपूर विधानसभा मतदारसंघात २४९ मतदान केंद्रे असून ६ डिसेंबरपर्यंत २,४०,८२६ मतदार आहेत.
काँग्रेस नेते आणि माजी आमदार संयम लोढा यांनीही सिंह यांच्यासंबंधात हा मुद्दा उपस्थित केला आणि एक्सवर त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह यांना मंत्रिपदाची शपथ देणे, हे आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो. प्रवीण गुप्ता यांना फोन करून तत्काळ कारवाईची मागणी केली.
भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी आपल्या पक्षाच्या निर्णयाचा बचाव करत सिंग यांनी राज्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ राज्यघटनेतील तरतुदींनुसार असल्याचे सांगितले. निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन जवळपास महिना उलटल्यानंतर शनिवारी राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. २१ भाजप आमदारांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात करणपूर विधानसभा मतदारसंघासाठी ५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह यांना शनिवारी राजस्थान सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील करण्यात आले, यावरून काँग्रेसने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे.
राज्यपाल कलराज मिश्रा यांनी येथील राजभवनात एका समारंभात शपथ देवविली. यामध्ये १२ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून, तर पाच जणांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशी आणि पाच जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
सुरेंद्र पाल सिंह यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केल्याबद्दल भाजपवर निशाणा साधत काँग्रेसच्या राजस्थान युनिटचे प्रमुख गोविंद सिंग दोतासरा म्हणाले की, त्यांचा पक्ष हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणी करेल.
सकाळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राजभवनात मिश्रा यांची भेट घेतली आणि शपथविधी सोहळ्यासाठी त्यांची परवानगी मागितली, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
राजस्थानमधील करणपूर विधानसभेसाठी २५ नोव्हेंबर रोजी होणारे मतदान काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले. आता ५ जानेवारीला निवडणूक होणार असून तीन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहेत.
भाजपचा अहंकार शिगेला पोहोचला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचा अवमान केला आहे आणि करणपूरमधील उमेदवार सुरेंद्रपाल सिंह यांना पदाची शपथ देऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे दोतासरा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मतदानापूर्वी भाजपने आपल्या उमेदवाराला मंत्री बनवण्याची देशातील ही पहिलीच घटना असावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने या निवडणुकीसाठी रुपिंदर सिंग कुनर यांना उमेदवारी दिली आहे, जी पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे वडील गुरमीत सिंग कुनर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. करणपूर विधानसभा मतदारसंघात २४९ मतदान केंद्रे असून ६ डिसेंबरपर्यंत २,४०,८२६ मतदार आहेत.
काँग्रेस नेते आणि माजी आमदार संयम लोढा यांनीही सिंह यांच्यासंबंधात हा मुद्दा उपस्थित केला आणि एक्सवर त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे उमेदवार सुरेंद्रपाल सिंह यांना मंत्रिपदाची शपथ देणे, हे आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो. प्रवीण गुप्ता यांना फोन करून तत्काळ कारवाईची मागणी केली.
भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी आपल्या पक्षाच्या निर्णयाचा बचाव करत सिंग यांनी राज्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ राज्यघटनेतील तरतुदींनुसार असल्याचे सांगितले.