राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले; काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांची सडकून टीका

काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते...
राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले; 
काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांची सडकून टीका
Published on

संभल : 'मोदी की गॅरंटी' वर शंका व्यक्त करण्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते काहीही बोलू शकतात, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांना फटकारले.

रविवारी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस एक 'रामविरोधी' आणि 'सनातन विरोधी' पक्ष बनला आहे, म्हणूनच ते नेते आणि सदस्य गमावत आहेत.

पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पदावर येतील याची 'कोणतीही शाश्वती नाही' या राहुलच्या दाव्यावर, आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, मन गमावलेली व्यक्ती काहीही बोलू शकते. एखाद्या मुलाचे किंवा संवेदनाहीन व्यक्तीचे शब्द गांभीर्याने घेण्याची गरज नाही. काँग्रेसच्या दुरवस्थेला जबाबदार एकमेव व्यक्ती राहुल गांधी आहेत. ते जोपर्यंत काँग्रेसमध्ये आहेत, तोपर्यंत काँग्रेसला कोणीही वाचवू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसवर आणखी निशाणा साधताना आचार्य कृष्णम म्हणाले, प्रभू रामाबद्दल असभ्यपणे बोलणाऱ्या पक्षात कोणालाही राहायचे नाही. असे सांगत प्रभू रामाच्या विरोधातून काँग्रेसने आपली राजकीय दिवाळखोरी आणि निराशा उघड केली आहे. काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. राहुल गांधी चालवत असलेल्या जहाजातून प्रत्येकजण उडी मारेल. सर्व विधाने व निर्णय काँग्रेसला अंताकडे नेणारे आहेत. जे एकेकाळी त्यांच्या पाठीशी होते तेच आता त्यांच्यावर ताशेरे ओढत आहेत, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in