कराचीत निवडणूक कार्यालयाजवळ स्फोट, जीवितहानी नाही, गुरुवारच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीची घटना

पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या कराचीतील कार्यालयाजवळ शनिवारी स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झाली नाही. देशात गुरुवारी (८ फेब्रुवारी रोजी) सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
कराचीत निवडणूक कार्यालयाजवळ स्फोट, जीवितहानी नाही, गुरुवारच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीची घटना
Published on

कराची : पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या कराचीतील कार्यालयाजवळ शनिवारी स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झाली नाही. देशात गुरुवारी (८ फेब्रुवारी रोजी) सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या कराचीतील कार्यालयाच्या पार्किंगमध्ये शनिवारी इम्प्रुवाईझ्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसचा (आयईडी) स्फोट झाला. त्यात हल्लेखोरांनी ४०० ग्रॅम स्फोटके वापरली होती. तसेच घटनास्थळावरून सुरक्षादलांनी १२ व्होल्ट्सची बॅटरी आणि टाइम-डिव्हाईस जप्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in