इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट? दिल्लीत सुरक्षेत वाढ

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.इस्रायलच्या भारतातील राजदूतांच्या नावाचे धमकीचे पत्र मिळाले.
इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट? दिल्लीत सुरक्षेत वाढ
PM

नवी दिल्ली : इस्रायलच्या नवी दिल्लीतील दूतावासाजवळ मंगळवारी सायंकाळी स्फोटाचे वृत्त आले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मंगळवारी दिल्ली पोलिसांना शहराच्या चाणक्यपुरी भागातील इस्रायलच्या दूतावासात स्फोट झाल्याचा दूरध्वनी आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलिसांना दूतावासाच्या आवाजाजवळ इस्रायलच्या भारतातील राजदूतांच्या नावाचे धमकीचे पत्र मिळाले. इस्रायलच्या दूतावासाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरात कसल्यातरी स्फोटाचा आवाज आला. पण, तो नेमका कशाचा होता, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यात दूतावासाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. इस्रायलचे अधिकारी दिल्ली पोलिसांच्या मदतीने या घटनेचा तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in