छत्तीसगडच्या सीमेवर स्फोटके जप्त

माओवाद्यांच्या क्षेत्रातील ही मोठी जप्ती आहे. ही स्फोटके सुरक्षा दल आणि गावकऱ्यांवर वापरण्यासाठी असावीत, असा अंदाज व्यक्त केला आहे.
छत्तीसगडच्या सीमेवर स्फोटके जप्त

मालकनगिरी (ओदिशा): ओदिशा पोलिसांनी माओवाद्यांनी मालकनगिरी जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणात लपवलेली स्फोटके जप्त केली. यात ४० किलो वजनाचे भूसुरुंग, १५० जिलेटीन काड्या, देशी बंदूक, गावठी बॉम्बसाठीची स्फोटके, गावठी बॉम्ब आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

ओदिशा पोलिसांना विशिष्ट खबर मिळाल्यानंतर आपले विशेष पथक कारवार्इसाठी पाठवले. या पथकासोबत जिल्हा कृती दलाचे पथक देखील होते. या दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या मथिली परिसरात शोधमोहीम सुरू केली. तेव्हा तुलसी आणि किरिमिती गावांच्या दरम्यान असलेल्या जंगलात ही स्फोटके लपवलेली आढळली. मंगळवारी दुपारी साडे चार वाजता पोलिसांनी ही स्फोटके ताब्यात घेतली. माओवाद्यांच्या क्षेत्रातील ही मोठी जप्ती आहे. ही स्फोटके सुरक्षा दल आणि गावकऱ्यांवर वापरण्यासाठी असावीत, असा अंदाज व्यक्त केला आहे. माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी या गटाची ही स्फोटके असावीत, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in