परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना मुदतवाढ

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला. मिस्त्री हे येत्या ३० नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. पण, केंद्राने त्यांचा कार्यकाळ १४ जुलै २०२६ पर्यंत वाढवला आहे.
विक्रम मिस्त्री
विक्रम मिस्त्री
Published on

नवी दिल्ली : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला. मिस्त्री हे येत्या ३० नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. पण, केंद्राने त्यांचा कार्यकाळ १४ जुलै २०२६ पर्यंत वाढवला आहे. कार्मिक खात्याने दिलेल्या आदेशात याबाबतची माहिती दिली. १९८९ च्या तुकडीचे ‘आयएफएस’ अधिकारी असलेल्या मिस्त्री यांनी यंदा १५ जुलै रोजी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. ते ३० नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. केंद्र सरकारच्या कार्मिक खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने परराष्ट्र सचिव म्हणून मिस्त्री यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरपासून १४ जुलै २०२६ पर्यंत वाढवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in