परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची कुवेतच्या दूतावासाला भेट- अमीर शेख नवाफ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी रविवारी अमीर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी कुवेतचा दौरा केला.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची कुवेतच्या दूतावासाला भेट- अमीर शेख नवाफ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
PM

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी नवी दिल्लीतील कुवेतच्या दूतावासाला भेट देऊन कुवेतचे दिवंगत अमीर शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक केला. भारत-कुवेत संबंध वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अमीर शेख नवाफ यांचे शनिवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रविवारी त्यांचा दफनविधी करण्यात आला. दिवंगत नेत्याच्या सन्मानार्थ भारताने रविवारी शासकीय पातळीवर शोक पाळला.

 जयशंकर यांनी सोमवारी सकाळी दिल्लीतील कुवैती दूतावासात जाऊन दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली. भारत-कुवेत संबंध मजबूत करण्यात अमीर शेख नवाफ यांचे योगदान भारत नेहमीच लक्षात ठेवेल, असे जयशंकर यांनी सोमवारी सांगितले. शेख नवाफ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी सकाळी दिल्लीतील कुवेतच्या दूतावासाला भेट दिली, असे त्यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) जारी केलेल्या संदेशात म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी रविवारी अमीर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी कुवेतचा दौरा केला. शेख नवाफ यांच्या निधनाने कुवेतने देशाला प्रगती आणि समृद्धीकडे नेणारा दूरदर्शी नेता गमावला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in