अंगणवाडी सेविकेच्या मुलाला फेसबुकची ऑफर

विद्यापिठातील कोणत्याही विद्यार्थ्याला आतापर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं सॅलरी पॅकेज ठरले आहे
अंगणवाडी सेविकेच्या मुलाला फेसबुकची ऑफर

कोलकात्यामधील जाधवपूर विद्यापिठातील एका विद्यार्थ्याने फेसबुकची ऑफर स्वीकारली असून वर्षाकाठी त्याला एक कोटी ८० लाखांचं वेतन देण्यात येणार आहे. या विद्यापिठातील कोणत्याही विद्यार्थ्याला आतापर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं सॅलरी पॅकेज ठरले आहे.

बिशेक मोंडल असे या तरुणाचं नाव असून त्याला यापूर्वी गुगल आणि अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्यांमकडूनही नोकरीच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र फेसबुकने त्याला या तिन्ही कंपन्यांपैकी सर्वाधिक वेतन देऊ केल्याने त्याने फेसबुकची निवड केली. “मी सप्टेंबरपासून फेसबुकमध्ये कामाला रुजू होणार आहे. ही नोकरी स्वीकारण्याआधी मला गुगल आणि अ‍ॅमेझॉनकडूनही नोकरीची ऑफर आलेली. मी फेसबुकची निवड केली कारण त्यांनी मला अधिक चांगलं वेतन देऊ केलं,” असं चौथ्या वर्षाला असणार बिशेकने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. तो कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकत असून कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्याला ही नोकरी लागली. “मंगळवारी रात्री मला कंपनीकडून ऑफर आली. मागील दोन वर्षांमध्ये करोना काळात मला अनेक कंपन्यांमध्ये इंटरर्नशीप करण्याची संधी मिळाली. या काळात मी बरंच काही शिकलो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in